जॉब देण्याच्या नावाखाली महिला डॉक्टरची फसवणूक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खासगी रूग्णालयात प्रशिक्षण घेत असलेल्या महिला डॉक्टरला जॉब देण्याच्या नावाखाली ६३ हजार ८२५ रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना उघडकीला आली आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, रावेर तालुक्यातील २३ वर्षीय महिला ही डॉक्टर असून जळगावात खासगी दावाखान्यात इंटर्नशिप करीत आहे. दरम्यान, २१ जून रोजी त्यांचे महिला डॉक्टरचे वडील यांच्या मोबाईलवर हॉस्पिटलच्या नावाने एक मेसेज आला.  हॉस्पिटल नोकरीसाठी अर्ज केला असावा म्हणून त्यांची आई यांनी हा मेसेज मुलीला पाठविला. होम बेस जॉब म्हणून मेसेज असल्याने महिलेने  २३ जून रोजी मेसेजमधील क्रमांकाच्या व्हाटसॲपवर मेसेज केला. त्यावर समोरील व्यक्तीने आम्ही तुम्हाला टास्क देऊ, ते तुम्ही पूर्ण केल्यानंतर तुमचे पैसे व कमिशन देऊ असे सांगून मोबाईलवर एक लिंक पाठवली. त्या वेबसाईडवर टास्क पूर्ण करायला सांगितला. त्यांनी सांगितल्यानुसार त्यांनी टास्क पूर्ण केले. सुरुवातीला त्यांच्या बँक खात्यातून १०० रुपये कपात झाले. त्यावर एक वस्तू घ्यायला सांगितली. ती घेतल्यानंतर पुन्हा २०० रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले असता महिला डॉक्टरच्या खात्यात ३८० रुपये जमा झाले. त्यानंतर पुन्हा एक हजार रुपये ट्रान्सफर करायला सांगण्यात आले. असे वेळोवेळी सहा टास्क पूर्ण करायला लावले. त्यात ६३ हजार ८२५ रुपयात ऑनलाईन केले. नंतर समोरील व्यक्तीने पैसेही परत केले नाही व कमिशनही दिले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिला डॉक्टर यांनी शनिवारी जिल्हा पेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर करीत आहेत.

Protected Content