धरणगाव, प्रतिनिधी । कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मोठया प्रमाणावर मनुष्यहानी झालेली असून, लाखो लोक बाधीत झालेले आहे. ‘आर्सेनिक’ अल्बम-30′ या होमीओपॅथी औषधामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते म्हणून जैन बांधवांना संघपती प्रवीण सुवालाल कुमट यांनी या औषधीचे मोफत वाटप केले आहे.
कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी ‘आर्सेनिक’ अल्बम-30 या होमीओपॅथी औषधीचा वापर केला जात आहे. ही बाब लक्षात घेऊन जैन स्थानकवासी संघाचे संघपती प्रवीण सुवालाल कुमट यांनी स्व खर्चाने आर्सेनिक अल्बम -30 या होमिपॅथिक गोळ्या जैन समाजातील प्रत्येक घटकाला त्यांच्या घरी जाऊन एक सामाजिक बांधिलकी म्हणून मोफत वाटप केल्या. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचे सकल जैन समाजाचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष अजय शेठ पगारिया यांनी आभार व्यक्त केले.