जैतपीर विद्यालयात युवक मित्र परिवार संस्थेतर्फे सायकलीचे वाटप

अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील जैतपिर येथील के.पी.सोनार माध्यमिक विद्यालयात धानोरा येथून दररोज पायी येणाऱ्या २२ आदिवासी विद्यार्थ्यांना युवकमित्र परिवार संस्थेतर्फे  मोफत सायकल वाटप करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी गरीब आर्थिक परिस्थितीचा बाऊ न करता अभ्यास भविष्यात यशस्वी होण्याचे आवाहन मारवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे यांनी केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जयेश खलाणे, युवकमित्र परिवाराचे संस्थापक प्रवीण महाजन,साने गुरुजी फाउंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, कळमसरे येथील पत्रकार प्रा.हिरालाल पाटील, शाळेचे संचालक पवन माळी, दीपक भागवत,सागर लहानगे, धानोरा येथील सरपंच दिलीप ठाकरे, जैतपिरचे सरपंच पंकज देशमुख हे उपस्थित होते.

युवकमित्र परिवार ही संस्था पुणे ,मुंबई शहरामध्ये जुन्या सायकलींचे संकलन करते व सायकली दुरुस्त करून ग्रामीण भागातील शाळांमध्ये लांब पायी जाणाऱ्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना ‘सायकल बँक उपक्रमांतर्गत’ मोफत वाटप करते. या वर्षी या उपक्रमातर्गत एक हजार सायकली वाटपाचा मानस असल्याचे यावेळी युवकमित्रचे संस्थापक प्रवीण महाजन यांनी सांगितले. पत्रकार हिरालाल पाटील यांनी सायकलींचा योग्य वापर करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  हिरालाल बाविस्कर यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्यध्यापक मुकेश अहिरे, शिक्षक जयेश जगताप, किरण हटकर,जयेश सोनवणे, आकाश पावरा, रावसाहेब मासुळे शिक्षिका  छाया जाधव, सोनाली मोरे, पल्लवी पाटील यांचे सहकार्य लाभले. तर उदयसिंग पाटील, प्रतीक चौधरी यांनी परिश्रम घेतले.

Protected Content