जुन्या वादातून मजुराला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील खंडेराव नगरात जुन्या वादातून एका मजूराला चाकू, कोयताचा धाक दाखवून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

रामानंद नगर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, गिरीश किशोर घुगे (वय-२०) रा. खंडेराव नगर, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. मंगळवारी ७ मार्च रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास जुन्या भांडणाच्या कारणावरून गल्लीत राहणारा लतीप शकील पिंजारी आणि त्यांच्यासोबत असलेल्या तीन अनोळखी व्यक्तींनी हाता चाकू, कोयता घेवून गिरीशच्या घरी आले. त्यावेळी त्याला धाक दाखवून तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. तसेच या परिसरात दहशत देखील पसरविली. हा प्रकार घडल्यानंतर दुपारी ४ वाजता गिरीश घुगे हा रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून लतीफ शकील पिंजारी याच्यासह सोबत असलेले अनोळखी तीन जणांविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विकास महाजन करीत आहे.

Protected Content