जुन्या वादातून तरूणासह आईला मारहाण; धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जुन्या भांडणाच्या कारणावरून धरणगाव तालुक्यातील दोनगाव येथे तरूणासह त्यांच्या कुटुंबाला बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवार २६ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, सुरज राहूल पाटील (वय-२१) रा. दोनगाव खुर्द ता. धरणगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतो. गावातील जुन्या भांडणाच्या कारणावरून बुधवारी २७ एप्रिल रोजी सुरज पाटील याला गावातील शिवादास विश्वास पाटील, समाधान गोकुळ पाटील, विष्णू गोकुळ पाटील, गोकुळ संतोष  पाटील, विश्वास संतोष पाटील सर्व रा. दोनगाव खुर्द ता. धरणगाव यांनी लोखंडी रॉड डोक्यात टाकून जखमी केले. तसेच सुरजची आई ज्योती पाटील यांना देखील अश्लिल शिवीगाळ तोंडावर मारले. याप्रकरणी सुरज पाटील यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्याने दिलेल्या फिर्यादीवरून शिवादास विश्वास पाटील, समाधान गोकुळ पाटील, विष्णू गोकुळ पाटील, गोकुळ संतोष  पाटील, विश्वास संतोष पाटील सर्व रा. दोनगाव खुर्द ता. धरणगाव  यांच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय चौधरी करीत आहे.

Protected Content