१ मे पासून शिर्डीचे साई मंदिर बेमुदत बंद !

शिर्डी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शिर्डी येथील साई मंदिराबाबत कोर्टाने घेतलेल्या एका निकालाच्या विरोधात १ मे पासून साई मंदिर बेमुदत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

याबाबतचे वृत्त असे की, शिर्डी मंदिरला वारंवार धमक्या येत आहेत. त्यामुळे शिर्डीतील साई मंदिराला महाराष्ट्र पोलीस, संस्थेचे सुरक्षा रक्षक, कंमाडो, बॉम्बशोधक पथकासह विविध प्रकारची सुरक्षा दिलेली आहे. तथापि, ही सुरक्षा पुरेसी नसल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. साईबाबा संस्थानला केंद्रीय सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी केली आहे. यावर कोर्टाच्या निर्देशानंतर साईबाबा संस्थानने केंद्रीय सुरक्षा लागू करण्यास तयारी दाखवलीय. मात्र शिर्डीतील नागरिकांनी या निर्णयास विरोध केला आहे. या अनुषंगाने येत्या १ मे पासून बेमुदत शिर्डी बंदची हाक दिली आहे.

 

शिर्डी हे देवस्थान संपूर्ण जगभरात प्रसिध्द आहे. जगातून येथे भाविक येत असतात. आता तर येथे विमानतळदेखील असल्याने भाविकांच्या संख्येत वाढ झाली आहे. मे महिन्याच्या सुटीत येथे मोठी गर्दी असते. तथापि, सुटीतच मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने भाविकांची गैरसोय होणार आहे.

Protected Content