हिंगणे पिंप्री येथे तरूणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण; पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । हिंगणे पिंप्री येथे शेतातील मका कापून नेत असल्याच्या कारणावरून जमावानो तरूणासह त्यांच्या कुटूंबाला लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले. तसेच जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात बुधवारी २७ एप्रिल रोजी जमावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अधिक माहिती अशी की, मयूर मंगलसिंग पाटील (वय-२१) रा. हिंगणा पिंप्री ता. जामनेर हा तरूण शेती करून आपला उदरनिर्वाह करतो. २५ एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास गावात राहणारा प्रल्हाद दगडू काळे हा मयूर पाटील यांच्या शेतातील मका कापून नेत असतांना रंगेहात पकडले. तसेच गेल्या महिन्यापासून शेतातील मका तूच चोरून नेत असेल असा आरोप केला. या रागातून सोबत असलेल्या १२ ते १३ जणांनी मयूर पाटील याला त्याच्या घरी असतांना बेकायदेशीर मंडळी जमवून प्रल्हा काळे याने लोखंडी रॉड सह चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच मयुर वाचविण्यासाठी आलेल्या काकू पुजा गोकुळ पाटील, कविता मंगलसिंग पाटील, आजी शकुंतला मुक्त्यारसिंग पाटील,वडील मंगलसिंग पाटील यांनी सोडवासोडण्याचा प्रयत्न केला असता त्यांना देखील शिवीगळ व मारहाण केली. हा प्रकार घडल्यानंतर मयुर पाटील याने पहूरपोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पहूर पोलीस ठाण्यात जमावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ किरण शिंपी करीत आहे.

Protected Content