जुन्या वादातून तरूणाला पाईपाने मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गेल्या वर्षाच्या जुन्या भांडणाच्या कारणावरून तरूणाला दोन जणांनी पाईपाने मारहाण करून दुखापत केल्याची घटना नशिराबाद येथे घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शाकीर शकील पिंजारी (वय-३०) रा. मोमीन मोहल्ला, नशिराबाद ता. जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मजूरी करून आपला उदरनिर्वाह करतो. मंगळवारी १९ जुलै रोजी रात्री ८ वाजता शाकीर हा त्याची दोन वर्षाची मुलगी मेवीश पिंजारी हिला (एमएच १९ सीए ८६६६) ने दवाखान्यात जात असतांना गावातील जैन मंदराजवळ एजाज मेहमुद पिंजारी, आवेश शेख इस्माईल पिंजारी दोन्ही रा. पिंजारी मोहल्ला, नशिराबाद यांनी गेल्या वर्षी झालेल्या भांडणाच्या कारणावरून शाकीर याला पकडून पाईपाने बेदम मारहाण करून दुखापत केली. शाकीर पिंजारी यांनी लागलीच नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेवून दोघांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी एजाज मेहमुद पिंजारी, आवेश शेख इस्माईल पिंजारी दोन्ही रा. पिंजारी मोहल्ला, नशिराबाद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ युनूस रसुल शेख करीत आहे.

Protected Content