जीव गमावलेल्या कोरोनायोद्धयांची राज्य सरकारकडे विस्तृत माहितीच नाही — डॉ. नितु पाटील

 

 

भुसावळ : प्रतिनिधी । कोरोना रुग्णांवर उपचार करताना जीव गमावलेल्या डॉक्टर्स , नर्सेस , सहाय्यक अशा कोरोनायोद्धयांची राज्य सरकारकडे विस्तृत माहितीच अद्याप नाही आता नगरविकास खात्याने अशी माहिती स्थानिक प्रशासनाकडून घेण्यास सुरुवात केली असल्याचे भाजप उत्तर महाराष्ट्र वैद्यकीय आघाडी सहसंयोजक डॉ .  नितु पाटील यांनी माहिती अधिकारात केलेल्या पाठपुराव्यानंतर स्पष्ट झाले आहे

 

 

राज्याच्या  नगरविकास  खात्याने  कोविड उपचारात  कर्तव्य बजावताना संक्रमणामुळे मृत्यू झालेले वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी  यांची व  केंद्र आणि राज्य सरकारने लागू केलेल्या कोरोना विमा कवच लाभाची ११  मुद्यांवर तपशीलवार माहिती मागितली आहे, आता जळगाव जिल्हा प्रशासन यावर काय उत्तर देते हे पाहणे औसूक्त्याचे ठरेल, असे  भाजप  वैद्यकीय आघाडीचे  उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नितु पाटील यांनी  सांगितले

 

 

 

माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत जुलै २०२० मध्ये डॉ. नितु पाटील यांनी मार्च  ते सप्टेंबर २०२० या काळात  जनमाहिती अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, सामान्य रुग्णालय,( जळगाव )  तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग  यांच्याकडे जीव गमावलेल्या कोरोना योद्ध्यांची माहिती मागितली होती, पण त्यांना फक्त  उपजिल्हा रुग्णालय,मुक्ताईनगर येथील एकमेव कोरोना योद्धा  मयत झाल्याचे कळविले गेले होते

 

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुंबई कार्यालयाने  तर विस्तृत माहिती नसल्याने माहिती देता येणार नाही असे ऑगस्ट २०२० मध्ये लेखी कळविले. होते

 

डॉ. नितु पाटील यांनी पाठपुरावा सुरू ठेवला.  हीच माहिती आता नगरविकास खात्याने  सर्व महानगरपालिका  व स्थानिक प्रशासनाकडे  मागितली आहे फेब्रुवारीमध्ये हीच माहिती  सर्व नागरपरिषदांचे मुख्याधिकारी  आणि नगर पंचायती यांना पण मागितली आहे.

 

कोरोना संकटात  जीवाची पर्वा न करता कर्तव्य निभवानारांबद्दल  कुठलीही माहिती प्रसासनाकडे नाही  ज्यांनी कोरोना  विमा कवच साठी अर्ज दाखल केले त्याबद्दलपण माहिती कळत नाही.त्यामुळे वारसांना आणि परिवाराला मानसिक त्रास होत असून यात शासनाची अनास्था दिसून येते.

 

 

जिल्हा मधील सर्व शहीद करोना योद्धा यांना विमा कवचाचे लाभ लवकर मिळावे यासाठी शासनाकडे पाठपुरावा करेल, त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर शासकीय नोकरी लागावी यासाठी देखील प्रयत्नशील राहील.” असेही डॉ. नितु पाटील यांनी सांगितले .

Protected Content