जीटीएल पाठोपाठ इंडीस’चेही होणार ३४ टॉवर सील

 

रावेर प्रतिनिधी । पुढील काही दिवस रावेर तालुक्यातील इंटरनेट सेवा विस्कळीत होण्याची चिन्हे निर्माणी झाली आहेत. आधीच जीटीएलचे अकार टॉवर सिल असतांना तहसिलदार यांनी इंडीस’चेही ३४ टॉवर सील करण्याचे आदेश काढले आहेत.

महसूल प्रशासनाकडून मिळालेली माहिती अशी की, महसूल कर भरण्यासाठी नोटीस देऊन सुध्दा संबधित कंपन्या कर भरण्यासाठी दिरंगाई करत आहे. शासनाकडून महसूल कर वसूल करण्याचे स्थानिक प्रशासनाला आदेश असल्याने महसूल कर वसूली संदर्भात तहसील प्रशासन अँक्शन मोड वर आहे. आज इंडीस कंपनी ३४ टावरचे १९ लाख ५० हजार रुपये थकविले आहेत. कंपनीने ही थकबाकी न भरल्याने आज तहसीलदार यांनी ३४ टॉवर सील करण्याचे आदेश काढले आहेत. आधीच तालुक्यातील ११ टॉवर सील असतांना  ३४ टॉवर सील करण्याचे आदेश काढल्याने मोबाईल धारकांची सेवा खंडित होणार असल्याने त्यांच्यात चिंतेचे वातावरण पहावयास मिळत आहे.

Protected Content