जिह्यातील संसर्गबाधित ५१०५ मृतांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान वाटप

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी – जिल्ह्यातील गेल्या दोन वर्षात संसर्ग प्रादुर्भावामुळे अनेकांना जीव गमवावा लागला, या राष्ट्रीय आपत्ती काळात संसर्गामुळे मृतांच्या कुटुंबियांना शासन स्तरावरून ५० हजार रुपये अनुदान देण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यात संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांच्या संबंधित वारसा पैकी ७४७८ प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाले होते. त्यापैकी पडताळणीअंती डीबीटी योजनेद्वारे ५ हजार १०५ जणांच्या पात्र प्रस्तावांना मंजुरी देण्यात येऊन बँक खात्यात ५० हजार सानुग्रह अनुदान मदतीचे वितरण करण्यात आले तर २३७५ प्रस्ताव अपात्र असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

जिल्ह्यात कोविडसंसंर्ग प्रादुर्भावाच्या तिन्ही लाटेत अनेकांना सामोरे जावे लागले. यात आरोग्य विभागासह जिल्हा रुग्णालय, डीसीसी, डीसीएचसी, सीसीसी तसेच होम क्वारंटाईन, असे अनेक उपचारासाठी परवानगी देण्यात आली होती. उपचारादरम्यान अनेकांचा मृत्य देखील झाला. त्यापैकी शासन निर्णयानुसार संसर्ग बाधित मृतांच्या कुटुंबियांना ५० हजार रुपये मदत सानुग्रह अनुदान म्हणून देण्याचे जाहीर करण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यात ७४७८ जणांनी सानुग्रह अनुदान मदतीचे प्रस्ताव सादर केले होते. जिल्हा प्रशासनाकडून योग्य, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून ५१०५ मदतीचे प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली तर २३७३ प्रस्ताव अपूर्णते अभावी वा अन्य कारणांमुळे नामंजूर करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

१ लाख ४८ हजाराहून अधिक रुग्ण उपचाराअंती झाले बरे
जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे १७ लाख, ५१ हजार २४९ आरटीपिसीआर तसेच अटीन्जेन चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी १५ लाख, ९७ हजार ५३५ अहवाल निगेटिव्ह तर १ लाख ५१ हजार ५३० अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या १ लाख ५१ हजार ५३० जणावर विविध ठिकाणी उपचार करण्यात आलेल्या उपचारानंतर १ लाख १४८ हजार रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत.

 

Protected Content