रमाई आवास योजनेचा निधी मिळावा; बोदवड पंचायत समितीसमोर उपोषण

बोदवड – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बोदवड तालुक्यातील नांदगाव येथीलरमाई आवास योजनानुसार घरकुल मंजूर झालेले आहेत. परंतु त्यांचे पहिला हप्ता त्वरित मिळत नसल्याने तक्रारदार यांनी बोदवड पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, याबाबत सविस्तर वृत्त असे की, “नांदगाव येथील रमाई आवास योजनेनुसार अनेक घरकुल मंजूर झालेले आहेत.परंतु त्यांचा पहिला हप्ता वर्क ऑर्डर दिल्यानंतरही मिळत नसल्याने प्रीतम पालवे यांनी बोदवड पंचायत समिती समोर स्वातंत्र्य दिनापासून आमरण उपोषणाला सुयवात केली आहे. आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे.

वर्क ऑर्डर मध्ये सांगितले आहे की, ‘घरकुलचे काम ६ महिन्याच्या आत करावे परंतु आता २ महिने उलटले तरीसुद्धा पहिला हप्ता मिळत नाही.’ त्यामुळे त्वरित घरकुल लाभार्थ्यांना हप्ता द्यावा, लाभार्थ्यांना त्वरित हप्ता न मिळाल्यास ग्रामसेवक दिलीप सुरवाडे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशा आशयाच्या मागणीसाठी प्रीतम पालवे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. पण अद्यापपर्यंत कोणतेही अधिकारी आलेले दिसत नाही.”

Protected Content