जळगाव प्रतिनिधी । आज जिल्ह्यात ७६ नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले असून यात चोपडा तालुका आणि जळगाव शहरातील सर्वाधीक रूग्णांचा समावेश असल्याचे दिसून आले आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून कोरोनोच्या रिपोर्टबाबतची माहिती अपडेट केली आहे. यानुसार आज जिल्ह्यात एकूण ७६ नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधीक २३ रूग्ण चोपडा तालुक्यातील तर याच्या खालोखाल १४ रूग्ण जळगाव शहरातील आहेत. याच्या सोबत भुसावळ, रावेर व पारोळा- प्रत्येकी ७; जळगाव ग्रामीण-१; अमळनेर-१; धरणगाव-३; यावल-४; एरंडोल-५; जामनेर-१; मुक्ताईनगर-३ अशा रूग्णांचा समावेश आहे.
आजच्या रिपोर्टमधून जिल्ह्यातील चोपडा तालुका आणि जळगाव शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले आहे. आज आलेल्या रिपोर्टनंतर जिल्ह्यात आजवरील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या ही १८०४ इतकी झालेली आहे. यामध्ये सर्वाधीक रूग्ण संख्या जळगाव तालुक्यात (शहर ३२२ + ग्रामीण ५६) ३७८ इतकी आहे. याच्या खालोखाल भुसावळ तालुक्यातील रूग्णांची संख्या ३१७ इतकी झालेली आहे. यानंतर अमळनेर-२२९; चोपडा-१४१; रावेर-१३३; भडगाव-९३; यावल-९६; धरणगाव-८८; जामनेर-८४; पाचोरा-४३; एरंडोल-५६; पारोळा-९३; चाळीसगाव-१८; मुक्ताईनगर-१५ व बोदवड- १४; व इतर जिल्ह्यातील ६ रूग्णांचा समावेश आहे.