मु.जे.महाविद्यालयाच्या परिसरातून विवाहिता बेपत्ता

जळगाव प्रतिनिधी । कॉलेजला जावून येते असे सांगून घरातून निघालेली विवाहिता मुळजी जेठा महाविद्यालयाच्या परिसरातून बेपत्ता झाल्याची घटना २२ मार्च रोजी दुपारी घडली. याप्रकरणी आज रामानंदनगर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गजानन जनत खर्डे (वय-२५) रा. मालगाव ता. शहादा जि. नंदूरबार याची पत्नी रोशना गजानन खर्डे ह्या मुळजी जेठा महाविद्यालयात शिक्षण घेते. दरम्यान, महाविद्यालयात शिष्यवृत्तीची चौकशी करण्यासाठी पती-पत्नी दोघेजण २२ मार्च रोजी दुपारी १२ वाजता मुळजी जेठा महाविद्यालयात आले. दरम्यान, कोरोनामुळे महाविद्यालयात एकाच व्यक्तीचा कार्यालयात जाण्याची मुभा असल्यामुळे गजानन खर्डे बाहेरच थांबले होते. तर त्यांची पत्नी रोशना खर्डे ह्या महाविद्यालयात गेल्या. त्यानंतर त्या बेपत्ता झाल्या. दरम्यान, अनेक वेळ झाल्यानंतर पत्नी बाहेर न आल्याने गजानन खडे यांनी शोधाशोध करूनही आढळून आले नाही. रामानंद नगर पोलीस ठाण्यात खर्डे यांच्या खबरीवरून हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास रामानंदनगर पोलीस करीत आहे. 

Protected Content