जळगाव प्रतिनिधी । आज रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात २१ रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले असून यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या ६२१ वर पोहचल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाने आज रात्री एका प्रेस नोटच्या माध्यमातून कोरोना बाधीतांची माहिती जाहीर केली आहे. यानुसार-जिल्ह्यात आज आणखी 119 कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. पैकी 98 अहवाल निगेटिव्ह तर 21 अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.
पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये चाळीसगाव 3, चोपडा 5, धरणगाव 2, वरणगाव 5, एरंडोल 3, भडगाव 1, निंभोरा, रावेर येथील 2 व्यक्तीचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या 621 इतकी झाली आहे.
आज रात्री आलेल्या रिपोर्टमधून कोरोनाची व्याप्ती वाढत असल्याचे दिसून आले आहे. चोपडा, वरणगाव आदी शहरांमधील कोरोनाचा संसर्ग वाढल्याचे दिसून येत आहे. चाळीसगावातील रूग्ण संख्या देखील वाढीस लागलेली आहे. तर काही खेड्यांमध्येही संसर्ग वाढल्याचे या रिपोर्टमधून स्पष्ट झाले आहे.