घरफोडीतील गुन्हेगारांची ओळख परेड

 

 

 भुसावळ : प्रतिनिधी ।  संभाव्य घरफोडी, चोरीसारख्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टिने आज  भुसावळ उपविभागातील पोलीस स्टेशन्सला यापूर्वी घरफोडीचे गुन्हे दाखल असणाऱ्या आरोपिंची २ तास ओळख परेड घेण्यात आली.

 

या ओळख परेडमध्ये उपविभागातील भुसावळ शहर पोलिस स्टेशनचे  रेकॉर्डवरील 7आरोपी, बाजारपेठ पोलिस स्टेशनचे रेकॉर्डवरील 7 आरोपी व भुसावळ तालुका पोलिस स्टेशनचे  रेकॉर्डवरील 7 आरोपी याप्रमाणे  एकूण 21 रेकॉर्डवरील आरोपी बोलावण्यात आले होते. ओळख परेड दरम्यान त्यांना  विचारपूस करण्यात आली  सध्या हे आरोपी काय करतात? कोणते वाहन वापरतात? कोणता मोबाईल वापरतात? आदी बाबींची सविस्तर माहिती नोंदविण्यात आली  त्यांचे इंटरोगेशन  फॉर्म भरून घेण्यात आले.

 

त्यांना चांगल्या वर्तनाची समज देण्यात आली.याशिवाय त्यांचेवर सीआरपीसी 110 खाली प्रतिबंधात्मक कारवाईचे प्रस्ताव तयार करण्यात आलेले असून कारवाई त्यांच्यावर करून घेण्यात येत आहे.

 

ओळख परेड कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण मुंडे, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या सूचनेनुसार उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भागवत, पोलीस निरीक्षक ठोंबे , पोलीस निरीक्षक कुंभार व तीनही पोलीस स्टेशन  यांच्या गुन्हे शाखेतील अंमलदार यांनी केलेली आहे….

 

Protected Content