Home Cities अमळनेर संत सखाराम महाराज यात्रोत्सवातून महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र लांबविले

संत सखाराम महाराज यात्रोत्सवातून महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र लांबविले

0
110

अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील संत सखाराम महाराज यात्रोत्सवातून एका महिलेच्या गळ्यातील २१ हजार २३८ रूपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सोमवारी २० मे रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी सकाळी ११ वाजता अमळनेर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकिता हर्षल देसले वय २४ रा. भगवती नगर, अमळनेर या महिला वास्तव्याला आहे. अमळनेर शहरात संत सखाराम महाराज याचा यात्रोत्सव सुरू आहे. त्यामुळे अंकिता देसले या महिला नातेवाईकांसोबत सोमवारी २० मे रोजी सकाळी ६ वाजता संत सखाराम महाराज यात्रोत्सवात आलेल्या होत्या. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील २१ हजार २३८ रूपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र चोरून नेले. यानंतर महिलेने अमळनेर पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार सकाळी ११ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ हे करीत आहे.


Protected Content

Play sound