जिल्ह्यात आज ३५ बाधित रूग्ण आढळले; १४ रूग्ण झाले बरे

जळगाव प्रतिनिधी । कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज जिल्ह्यात ३५ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहे. तर आच १४ बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. 

आजची आकडेवारी

जळगाव शहर – ६, जळगाव ग्रामीण-०, भुसावळ-२, अमळनेर-०, चोपडा-०, पाचोरा-१, भडगाव-०, धरणगाव-१, यावल-११, एरंडोल-०, जामनेर-३, पारोळा-१, चाळीसगाव-५, मुक्ताईनगर-०, बोदवड-१ आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण ३५ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

आजच्या अहवालानुसार जिल्ह्यात आजवर ५७ हजार ३८९ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ५५ हजार ६७९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ३४८ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज जळगाव शहर आणि भुसावळ तालुक्यातील प्रत्येकी एका रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. 

Protected Content