जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, आज चिंता व्यक्त करणारी बाब म्हणजे तब्बल ६३ रूग्ण कोवीड पॉझिटीव्ह आढळून आल्याने जिल्ह्यात अत्यंत भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे. दिवसेंदिवस आकड्यांचा आलेख हा वाढतच आहे. आज आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात ६३ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आली आहेत. एकुण आकडा १ हजार ८३ झाला आहे. राज्यात जळगाव जिल्ह्यातील मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक असल्याने चिंता वाढली आहे.
जिल्हा प्रशासनाकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरात १२, भुसावळ १०, अमळनेर १५, चोपडा १, धरणगाव २, यावल ८, एरंडोल ४, जामनेर ३, रावेर ४, चाळीसगाव २ बोदवड १, तर दुसऱ्या जिल्ह्यातील १ अशी पॉझिटीव्ह रूग्णांची आकडेवारी जाहीर केली आहे. गेल्या तीन दिवसांपासून वरूणराजाची हजेरी सुरू असल्याने जरी काहीसा दिलासा मिळाला असला तरी पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या स्फोटक होवू शकते अशी चिंता कालच जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे. जिल्हा प्रशासन व पालिका प्रशासन खबरदारी घेत आहे. मात्र नागरिक याकडे गंभीरपणे बघत नसल्याने जिल्ह्याच्या दृष्टीने चिंता व्यक्त होत आहे. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केली आहे.