जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील स्वॅब घेतलेल्या १८० कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. त्यापैकी १७७ तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर ३ व्यक्तींचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहे.
पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्ती या जळगावातील सुप्रीम काॅलनी, शिवाजी नगर, संभाजी चौक येथील आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या ४४५ इतकी झाली आहे.
जिल्ह्यातील १९५ रूग्ण कोरोनावर मात करून बरे होऊन घरी गेले आहे तर ५० कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.