जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा रूग्णालयांमध्ये होणार दिव्यांग तपासणी शिबिर

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पाठपुराव्यानंतर जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा रूग्णालयांमध्ये दिव्यांग तपासणी शिबिर आयोजन करण्याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी बैठकीत संबधितांना आदेशित केले.

 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे, दिव्यांग जनकल्याण संस्था यांनी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे प्रजासत्ताकदिनी, स्वातंत्र्यदिनी वारंवार आंदोलन व मोर्चे काढुन दिव्यांग व्यक्तींच्या सुविधांबाबत मूलभूत मागण्या केल्या होत्या. यासोबत शासन निर्णयानुसार दिव्यांग तपासणी शिबीर हे प्रत्येक उपजिल्हा रुग्णालयात घेण्यात यावे यासाठी ही मागणी लावून धरल्याने जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा शल्य चिकित्सक जळगाव ,अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव यांना उपजिल्हा रुग्णालयांमध्ये दिव्यांग तपासणी शिबिर घेण्याचे आदेशित केले होते. त्या अनुषंगाने उपजिल्हा रूग्णालय मुक्ताईनगर येथे काही महिन्यांपासून दिव्यांग तपासणी शिबिर सुरू करण्यात आले. त्याच मागणीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील जामनेर ,चोपडा ,चाळीसगाव या उपजिल्हा रुग्णालय मध्येसुद्धा दिव्यांगी तपासणी शिबिर घेण्याचे कार्यालयीन आदेश जिल्हा शल्यचिकित्सक यांनी काढले आहेत. यामुळे दिव्यांग व्यक्तींची लांब लांबून जळगाव येथे ये जा करताना होणारी होरपळ थांबेल व दिव्यांगांना त्यांच्या जवळच्या तालुक्याच्या ठिकाणीच दिव्यांग प्रमाणपत्र मिळेल. यामुळे दिव्यांग व्यक्तींकडून तसेच परिसरातील नागरिकांकडून स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ विवेक सोनवणे व दिव्यांग जणकल्याण संस्थेचे कौतुक होत आहे.

 

Protected Content