जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील कारोना बधितांची संख्या पाचशेच्या पार केला आहे. जिल्ह्यातील भडगाव, पारोळा, धरणगाव येथील ४७ जणांचा कोरोना अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला असून त्यापैकी दोन जणांना अहवाल पॉझिटीव्ह आला. तर उर्वरित ४५ जण निगेटीव्ह आला आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा ५०१ वर पोहचला आहे.
जिल्हा कोविड रूग्णालयाने जिल्ह्यातील भडगाव, पारोळा आणि धरणगाव तालुक्यातील ४७ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्यापैकी ४५ जणांचे अहवाल निगेटीव्ह तर २ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. पॉझिटीव्ह आलेल्यामध्ये व्यक्तीमध्ये पहिला वडगाव ता. भडगाव तर दुसरा धरणगाव येथील पालिकेचा कर्मचारी आहे. जिल्ह्यात एकुण बाधितांचा आकडा ५०१वर पोहचला आहे. नागरीकांनी घाबरून न जाता घरीच सुरक्षित रहा असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.