खळबळजनक: धरणगाव नगरपालिकेचा कर्मचारी कोरोनाबाधित

धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव नगरपालिकेचा ३० वर्षीय कर्मचारी कोरोनाबाधित असल्याचा अहवाल नुकताचा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. या वृत्ताला तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, पालिका कर्मचारी वास्तव्यास असलेला परिसर सील करण्याचे काम सुरू आहे.

धरणगाव तालुका एकीकडे कोरोनामुक्तकडे वाटचाल करत असतांना आज पुन्हा एका नगरपालिका कर्मचाऱ्याचा तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्याला न्युमोनियाची लक्षणे जाणवू लागल्याने १३ मे रोजी जळगाव कोविड रूग्णालयात उपचार सुरु होते. यामुळे धरणगाव पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या वृत्ताला या वृत्ताला तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी दुजोरा दिला आहे. नगरपालिका कर्मचारी वास्तव्यास असलेला परिसर धरणगाव तालुका प्रशासनातर्फे सील करण्याचे काम सुरू आहे. धरणगाव तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडा ११ वर पोहचला आहे. यापैकी दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यापैकी ८ रूग्ण बरे होवून घरी सोडण्यात आले आहे. तर एक रूग्णावर उपचार सुरू होते. नागरीकांनी लॉकडाऊनचे उल्लंघन न करता घरीच सुरक्षित रहावे असे आवाहन नगरपालिका व तालुका प्रशासनाने केले आहे.

Protected Content