जिल्ह्यातील आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र भरण्याचे आवाहन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र शासन व राज्य शासनाच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालये, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी क्षेत्रातील आस्थापना, उद्योग, व्यापार, व्यावसायिक, कारखाने, कंपनी इ. यांनी त्यांच्याकडील माहे 1 एप्रिल ते ३० जून, २०२३ या कालावधीचे कार्यरत मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र (ई-आर-1) ३१ जुलै, २०२३ पर्यंत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पध्दतीने सादर करावे, असे  रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त वि.जा.मुकणे यांनी कळविले आहे.

 

सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे सक्तीने अधिसूचित करणारा) कायदा, १९५९ व नियमावली, १९६० अन्वये त्रैमासिक विवरणपत्र भरणे बंधनकारक आहे. या अनुषंगाने १ एप्रिल ते ३० जून, २०२३ या कालावधीचे आपल्या आस्थापनेवरील कार्यरत मनुष्यबळाची माहिती दर्शविणारे त्रैमासिक विवरणपत्र (ई आर-१) विभागाच्या नमूद संकेतस्थळावरील रोजगार या ऑप्शनमधील नियोक्ते वर क्लिक करुन आपल्या युझर आयडी व पासवर्डच्या सहाय्याने ३१ जुलै, २०२३ पर्यंत भरावयाची आहे. याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्र. ०२५७-२९५९७९० वर संपर्क साधावा. यात कसूर झाल्यास आणि आस्थापना दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. असेही श्री. मुकणे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

Protected Content