जळगावात राष्ट्रवादी महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी भरले प्रतिज्ञापत्र !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत आता दोन गट पडले आहे. या अनुषंगाने जळगाव शहरातील राष्ट्रवादी कार्यालयात मंगळवारी राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या महानगराध्यक्ष मंगला पाटील यांनी महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रतिज्ञापत्र असलेले अर्ज भूरून घेतले आहे. मुंबईल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बैठकीत हे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा उभी फूट पडल्याने राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. यात राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाले आहे. अजित पवार यांनी सरकारला पाठींबा देवून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. शिवाय त्यांच्यासोबत इतर नऊ आमदारांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे मुंबईत राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मुंबई बैठक घेणार असल्याने पदाधिकारी व कार्यकर्ते हे आम्ही साहेबांसोबत असल्याचे प्रतिज्ञापत्र अर्ज सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने महिला पदाधिकारी यांच्या प्रतिज्ञापत्र महानगराध्यक्षा मंगला पाटील यांनी मंगळवारी ४ जुलै रोजी भरून घेतले आहे. यावेळी जळगावातील राष्ट्रवादी महिला आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्त्या शरद पवार यांच्यासोबत असल्याची भूमिका महानगराध्यक्ष मंगला पाटील यांनी  जाहीर केली आहे.  हे सर्व अर्ज मुंबई येथील शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षाच्या बैठकीत सादर केले जाणार आहेत असल्याचंही मंगला पाटील यांनी सांगितलं. यावेळी प्रतिभा शिरसाठ, यांच्यासह महिला पदाधिकारी कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Protected Content