जिल्हा शिक्षक क्रिकेट लीगमध्ये जळगांवचा टिचर्स क्रिकेट क्लब विजयी

पाचोरा, प्रतिनिधी । जळगाव येथे इकरा शैक्षणिक संस्थेच्या मैदानावर जिल्हयातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट लीगमध्ये जळगांव टिचर्स क्रिकेट क्लबने अंतीम सामन्यात जळगांव येथील ऐ. डी. ई. आय. उर्दू संघाचा १७ धावांनी पराभव करुन ट्रॉफी जिंकली.

३ दिवस चाललेल्या लीगमध्ये जिल्हाभरातून पाचोरा, अमळनेर, भडगांव, भुसावळ, बोदवड, धरणगांव, एरंडोल, पारोळा, रावेर, जामनेर, यावल, जळगांव येथून प्राथमिक, माध्यमिक, आश्रमशाळा शिक्षकांचे एकूण १८ संघ सहभागी झाले होते.

या लीगचे मुख्य प्रायोजक जळगांव येथील स्वामी समर्थ फाऊंडेशनचे अध्यक्ष व ग. स. सोसायटीचे अध्यक्ष – मनोज आत्माराम पाटील हे होते. विशेष सहकार्य ग. स. सोसायटीचे संचालक – महेश विठ्ठलराव पाटील, अनिल गायकवाड, शिक्षक सेनेचे जिल्हा पदाधिकारी – संदीप सुकदेवराव पवार यांचे लाभले. विजेत्या संघास बक्षीस वितरण जि. प. शिक्षण सभापती – रविंद्र सुर्यभान पाटील, राष्ट्रवादी पक्षाचे अल्पसंख्याक आघाडीचे नेते – गफार मलीक, इकरा शै. संस्थेचे अध्यक्ष – करीम सालार, मनोजकुमार आत्माराम पाटील, पाचोरा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी – विकास पाटील, जि.प. जळगांवचे प्र. उपशिक्षणाधिकारी – विजय पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

अंतीम सामन्यात सामनावीर तसेच मालिकावीर – सुनिल बोरसे, उत्कृष्ट फलंदाज – जयवंत खैरनार, उत्कृष्ट गोलंदाज – इम्रान शेख, उत्कृष्ट यष्टीरक्षक – अली याप्रमाणे पुरस्कार देण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षण विस्तार अधिकारी – खलील शेख, सुनील पितांबर पाटील, संदीप पवार, किशोर पाटील, मुकेश पाटील, अभिजीत साळुंखे, धनराज वानखेडे, महेंद्र वाणी, ज्ञानेश्वर माऊली, अश्फाक, आसीम, साजीद, शमसुद्दीन, नदीम इतर यांचे अनमोल सहकार्य लाभले. स्पर्धेत हॅट्रीक घेणाऱ्या सर्व गोलंदाजांना संदीप पवार सर यांचेकड्रून १ हजार १ रुपये रोख बक्षीस देण्यात आले.

Protected Content