Home धर्म-समाज पाचोऱ्याच्या शैलेश कुलकर्णी चित्राची राष्ट्रीय कला प्रदर्शनात निवड

पाचोऱ्याच्या शैलेश कुलकर्णी चित्राची राष्ट्रीय कला प्रदर्शनात निवड

0
36


 

पाचोरा, प्रतिनिधी  । तालुक्यातील जारगाव येथील  नवोदित चित्रकार तसेच रांगोळीकार शैलेश कुलकर्णी यांच्या चित्राची नुकतीच भारतातील प्रतिष्ठित संस्थांपैकी एक अशा बॉम्बे आर्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्या राष्ट्रीय वार्षिक कला प्रदर्शनात निवड झाली आहे.

शैलेश कुलकर्णी यांनी  विद्यार्थी दशेत असतांना देखील त्यांनी व्यावसायिक गटातून एन्ट्री करून हे यश मिळविले आहे.  दरवर्षी हे वार्षिक कला प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई येथे भरते मात्र सध्या कोविड सदृश्य परिस्थिती असल्याने हे प्रदर्शन बॉम्बे आर्ट सोसायटी यांच्या वेबसाईट वर दिनांक २५ मार्च ते २५ एप्रिल या कालावधीत सुरू असणार आहे. या पूर्वी देखील त्यांच्या चित्रांची निवड राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर निवडली गेली आहेत.तसेच रांगोळी कलेचा सुद्धा छंद असणाऱ्या शैलेश कुलकर्णी यांनी रांगोळी कलेतून देखील त्यांनी आपले नाव तसेच संपूर्ण तालुक्याचे नाव देखील राष्ट्रीय स्तरावर पोहोचविले आहे . या यशाबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे.

 


Protected Content

Play sound