जिल्हा शासकीय महाविद्यालयात ३९८ दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्राचे वाटप

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयात नॉन कोवीड सुविधा पुर्ववत झाल्यानंतर दिव्यांग मंडळ कार्यान्वित करण्यात आली आहे. आज बुधवार १३ जानेवारी रोजी विविध तज्ञ वैद्यकिय अधिकारी यांनी रूग्णांच्या तपासणीत तब्बत ३९८ जणांना प्रमाणपत्र देण्याबाबतची कार्यवाही करण्यात आली.

कोरोना काळात दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्र वाटपाचे काम थांबले होते. दिव्यांग बांधवांच्या होत असलेल्या असुविधेबाबत अनेक दिवसांपासून ही प्रमाणपत्र देण्याची सुविधा बुधवार २३ डिसेंबर पासून सुरू करण्यात आली आहे. दर बुधवारी वैद्यकीय तपासणी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत केली जाते. आजचा हा तिसरा बुधवार होता. ही तपासणी मुख्य गेट नं २ कडील अधिष्ठाता कार्यालयासमोरील दिव्यांग मंडळाच्या कार्यालयात सुरूवात करण्यात आली. यावेळी २१ प्रकारच्या विविध तज्ञ तपासणी करून त्यानुसार प्रमाणपत्र दिले. आज आयोजित केलेल्या दिव्यांग मंडळाच्या वतीने ३९८ जणांची तपासणी करण्यात आली असून त्यांना प्रमाणपत्र देण्याबाबतची कार्यवाही करण्यात आली.

दिव्यांग बोर्डाचे अध्यक्ष डॉ मारोती पोटे वैद्यकीय अधीक्षक डॉ वैभव सोनार यांच्यासह तज्ञ डॉक्टरांनी तपासणी केली. सोबत
डॉ.पियुषकुमार टाक मेडिसीन, डॉ.गिरीश राणे ऑर्थो, अजय सोनवणे ऑर्थो, डॉ.राजेंद्र अग्रवाल ऑर्थो, कान-नाक डॉ. नितीन विसपुते, मानसिक डॉ.दिलीप महाजन, डोळ्यांचे डॉ.पाटील प्रवीण यांच्यासह कर्मचारी गोपाळ सोळंकी, चेतन निकम, दत्तात्रय पवार, रुपाली दुसाने यांनी सहकार्य केले.

लाभार्थींनी प्रमाणपत्रासाठी सुरूवातीला ( www.swavlambancard.in ) या संकेतस्थळावून जावून अर्ज भरणे अनिवार्य आहे. या अर्जाची प्रिंट काढून अर्जासह आधारकार्ड, रेशनकार्ड, पासपोर्ट दोन फोटो व जून दिव्यांग प्रमाणपत्र तथा संबंधित कागदपत्र घेवून शासकीय रूग्णालयात दर बुधवारी लाभार्थ्यांनी उपस्थित रहावे. तपासणीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर प्रमाणपत्र घरपोच पुढील आठ दिवसात संकेतस्थळावर प्रिंट काढन लाभार्थ्यांला मिळणार आहे. दिव्यांग मंडळ या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केले आहे.

Protected Content