जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयात दाखल केलेल्या रूग्णावर वेळीच उपचार न झाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. दुपारी ३ वाजेच्या सुमारास जिल्हा कोवीड रूग्णालयात गोंधळ निर्माण झाला होता.
याबाबत माहिती अशी की, शरीफ शहा अनिफ शहा (वय-४५) रा. तांबापुरा हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांनी खासगी डॉक्टरांकडे उपचारही केले. आज दुपारी २ वाजेच्या सुमारास त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. यावेळी डॉक्टरांनी कोरोनाची लक्षणे असल्याचे समजून तपासणी न करताच रूग्णाला दुरूनच औषधी दिले. अर्ध्यातासात रूग्णाला मृत्यू झाल्याची घोषणा वैद्यकिय अधिकारी यांनी केली. दरम्यान, वैद्यकिय अधिकारी यांनी रूणाला तपासणी न केल्यामुळे मृत्यू झाला आहे असा आरोपी नातेवाईकांनी केला आहे. दुपारी तीन वाजेच्या सुमारास जिल्हा रूग्णालयात गोंधळ निर्माण झाला होता. शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत पोलीसांकडून कोणतीही कारवाई झालेली नव्हती.