जळगाव प्रतिनिधी । जिल्हा बँकेला 31 मार्च 2019 अखेर 53 कोटी 75 लाख रूपयांचा ढोबळ नफा झाला अशी माहिती आमदार एकनाथराव खडसे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर, उपाध्यक्ष आमदार किशोर पाटील, आमदार एकनाथराव खडसे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार चिमनराव पाटील, आमदार राजूमामा भोळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा संचालक रविंद्रभैय्या पाटील, तिलोत्तमा पाटील, अनिल पाटील, बँकेचे व्यवस्थापक आणि इतर संचालक मंडळ उपस्थित होते.
बँकेच्या जळगाव जिल्हा बँकेच्या आज झालेल्या सर्व साधारण सभेत गेल्यावर्षी वर्षभराचा आर्थिक आढावा घेण्यात आला बँकेच्या एकूण ठेवी तीन हजार 266 कोटी व 37 लाख असून ठेवीदारांच्या ठेवी वर इन्शुरन्स क्रेडिट गॅरंटी कार्पोरेशनकडून विम्याचा हप्ता भरून किसान क्रेडिट कार्ड धारक शेतकऱ्यांना विम्याचे संरक्षण मिळाले आहे बँकेच्या भागभांडवलाच्या वाढ झाली असून 192 कोटी 87 लाख एवढी वाढ झाली आहे.
त्यावर्षी ठेवींमध्ये 280 कोटी रुपयांची वाढ झाली यावरून ठेवीदारांचा अधिक विश्वास दिसून येत असल्याचेही माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सांगितले. गेल्या शंभर वर्षात आपण दरवेळी आरबीआय, नाबार्ड सारख्या बँकांकडून कर्ज वितरित करण्यासाठी रक्कम घेत होतो आता बँकेची परिस्थिती स्थिर झालेली आहे. बँकेच्या नेटवर्कमध्ये वाढ झाली असून 31 मार्चपर्यंत नेटवर्कमध्ये 131 कोटी 37 लाख वर पोहोचली आहे. शंभर वर्षाच्या इतिहासात प्रथमत स्वतःच्या भांडवलातून शेतकऱ्यांना कर्ज दिले जात आहे.
यावर्षी ठेवींमध्ये अधिक प्रमाण वाढल्याने बँकेला त्यातूनच मिळायला लागले आहे. बँकेच्या नियमानुसार सीआरआर मध्ये ही वाढ झाली आहे. जिल्हा बँकेच्या जिल्ह्यात असलेल्या सर्व शाखा ऑनलाइन जोडले गेलेले आहेत त्यांचे संगणीकृत व्यवहार आता ऑनलाइन होत आहे. शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेल्या किसान क्रेडीट कार्डधारक शेतकऱ्यांच्या एक लाखाचा विमा काढला गेलेला आहे.
225 नोकरांची होणार भरती
बँकेची परिस्थिती आता सुधारली असल्याने 550 जागांपैकी पहिल्या टप्प्यात 225 जागा भरण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार असून यामध्ये वशिलेबाजी, दबाव किंवा ओळखीचे व्यक्तींना भरती करता येणार नाही, असेही यावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.