जळगाव, प्रतिनिधी | होमगार्ड्सने कोरोना काळात नि:स्वार्थ भावनेने विनावेतन आपले राष्ट्रीय कर्तव्य पोलीस दला सोबत पार पाडले. याची दखल घेऊन जिल्हा पोलीस दलातर्फे त्यांना पोलिस कवायत मैदान येथे कोरोना योद्धा सन्मान देवून सन्मानित करण्यात आले.
कोरोना योद्धा सन्मान सोहळ्याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत,पोलिस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे, जिल्हा होमगार्ड्स समादेशक तथा अपर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांचे हस्ते १४० होमगार्ड्सना गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. प्रसंगी अपर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केले. होम डीवायएसपी विठ्ठल ससे, एटीसी विभागाचे एएसआय भास्कर पाटील, प्रदिप बडगुजर, श्रावण पगारे, प्रविण पाटील, अजय पाटील, नवजित चौधरी, राहूल बैसाणे, प्रमोद वाड़ीले, प्रशिक्षक राजेश वाघ, देवीदास वाघ, सोपानदेव पाटील यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. राखीव पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, वायरलेस विभागाचे पोलिस उप निरीक्षक संजय मराठे,पोलिस कल्याण विभागाचे रावसाहेब गायकवाड़, सतिश देसले यांनी सहकार्य केले. दहशतवाद विरोधी कक्षाचे पोलिस उप निरीक्षक चंद्रकांत पाटील यांनी आभार मानले. पोलिस बिनतारी संदेश विभागाचे अमित माळी यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केले.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1255590524910233