ट्रॅक्टरवरून पडल्याने तरूणाचा मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वाळूच्या ट्रॅक्टरवरून पडल्याने तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना सावखेडा गावात सोमवारी १९ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कृष्णा विजय सोनवणे (वय-२६) रा. सावखेडा ता.जि.जळगाव असे मृत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील सावखेडा येथे कृष्णा सोनवणे हा वडील विजय सोनवणे आणि आई संगिता सोनवणे यांच्यासह वास्तव्याला होता. कृष्णा हा वाळूच्या ठेक्यावर कामावर होता. तर वडील देखील वाळू ट्रॅक्टरवर कामाला जातात. नेहमीप्रमाणे सोमवार १९ सप्टेंबर रोजी १२ वाजेच्या सुमारास कृष्णा सोनवणे हा वाळूच्या ट्रॅक्टरवर होता. सावखेडा गावाच्या बाहेर ट्रॅक्टरवर काम करत असतांना तो ट्रॅक्टरवरून खाली पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. खानेता पठाण यांनी मयत घोषीत केले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी गर्दी केली होती. चार वर्षांपुर्वी कृष्णाचा मोठा भाऊ याचा देखील अपघातात निधन झाले आहे. त्याच्या पश्चात आई संगिता, वडील विजय खंडू सोनवणे आणि विवाहित बहिण असा परिवार आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोहेकॉ सतिश हारनोळ करीत आहे.

Protected Content