पिंपळगाव येथे मुख्य कायर्कारी अधिकाऱ्यांची भेट : विविध योजनांची केली पाहणी

पाचोरा, प्रतिनिधी | तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर) येथे आज जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी येथील माझी वसुंधरा योजनेअंतर्गत लावलेल्या फळबागेची व वृक्षांची पाहणी केली. यानंतर पिंपळगाव (हरे.) ला प्रथम क्रमांक कसा मिळवता येईल यासाठी त्यांनी  मार्गदर्शन केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सीताफळ फळबाग व ग्रामीण रुग्णालय पिंपळगाव (हरे.) येथे लावलेले ८०० वृक्ष यांची व विविध उपक्रमाची पाहणी केली. प्रत्यक्ष भेट देऊन विविध उपाय योजनांचा आराखडा तयार केला. माझी वसुंधरा दुसऱ्या वर्षात पदार्पण झाले असुन त्यासाठी नव्याने कामाला लागून पिंपळगाव (हरे.) ला प्रथम क्रमांक कसा मिळवता येईल यासाठी मार्गदर्शन केले. या अभियानातून राज्याला वातावरणीय बदलाच्या समस्या सोडवण्यासाठी आणि विविध उपाययोजना हाती घेण्यातही मदत होणार आहे. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, गट विकास अधिकारी अतुल पाटील, प्राथमिक शिक्षण अधिकारी विकास पाटील, जिल्हा परिषद सदस्य मधूकर काटे, ग्रामसेवक बी. एस. पाटील उपसरपंच सुखदेव गीते, वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश पवार, सुभाष सावळे, रवी गीते, ग्रा. पं. सदस्य भगवान पाटील, गोरख पाटील, अंतिम महाजन, अल्लाउद्दीन तडवी, वसंत पाटील, अनिल महाजन, देवेंद्र देव, दिलीप जैन, सलीम कारागीर, अजय तेली, प्रशांत पाटील, कैलास क्षीरसागर, कोमलसिंग देशमुख सह गावातील राजु महाजन, तुषार चौधरी, ज्ञानेश्वर गीते, राधाकिसन तेली, बाजीराव गीते, सचिन मोरे, ईश्वर कोळी, हेमंत परदेशी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Protected Content