भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत आज बाल आनंद मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला.
पिचर्डे जिल्हा परिषद मराठी शाळेत आज विघार्थी व विघार्थीनींच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी हा आंनद मेळावा घेण्यात आला दरवर्षी हा आंनद मेळावा घेण्यात येतो लहान विघार्थी हे आपल्या घरून विविध पदार्थ तयार करून या ठिकाणी विक्री करतात व त्यांना व्यवहारीक ज्ञान मिळावे यासाठी हा प्रयत्न असतो याठिकाणी गावातील विविध पदधिकारी यांनी वस्तू विकत घेऊन मुलांना प्रोत्साहित केले.
यावेळी प्रतिमा पुजन पिचर्डे संरपच सौ.किरणताई वैराळे, उपसंरपच सौ स्वातीताई पाटील,यांच्या हस्ते झाले तर उदघाटन माजी उपसंरपच विनोद बोरसे यांच्या हस्ते झाले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य विजय महाजन,गावातील निंबा वाघ, रवींद्र आधार पाटील, रविंद्र महाजन,साहेबराव पाटील, हेमराज पाटील, संजय कोळी,विरभान पाटील, सतिश पाटील, विकास महाजन,रवींद्र वाघ समाधान कोळी, यांच्या सह शाळेतील मुख्याधापक माधव पाटील, उपशिक्षक अयुब पिंजारी,सुरेश भिल,उपशिक्षका सुनंदा खोडके ,रिना पाटील उपस्थित होते.