जिल्हा परिषद जळगावचा डिजिटल बुक उपक्रम नाशिक विभागात राबवणार (व्हिडिओ )

जळगाव, प्रतिनिधी | आपला जिल्हा आपले उपक्रम भाग चार या डिजिटल बुकचे नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांच्या दालनात विभागीय परीक्षा मंडळ कार्यालय नाशिक येथे प्रकाशन करण्यात आले.

कोरोना काळात विविध शैक्षणिक उपक्रम तसेच या ई -पुस्तकातील उपक्रम राबविणाऱ्या शिक्षकांचे व शिक्षण विभागाचे अभिनंदन करत हा उपक्रम नाशिक विभागात राबवणार असे प्रतिपादन शिक्षण उप संचालक नितीन उपासनी यांनी केले.

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग अंतर्गत प्राथमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब अकलाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आपला जिल्हा आपले उपक्रम हे ई-पुस्तक तयार करण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम लॉकडाऊनच्या काळात राबविण्यात आला होता.  या पुस्तक प्रकाशन प्रसंगी शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी, जळगाव शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, नाशिक शिक्षणाधिकारी वैशाली झनकर, नाशिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील, नंदुरबार शिक्षणाधिकारी एम. व्ही. कदम, जळगाव प्रभारी उपशिक्षणाधिकारी विजय पवार, शिक्षण विस्तार अधिकारी एजाज शेख, शिक्षण विस्तार अधिकारी गणेश शिवदे, कल्पना पाटील, अरुणा उदावंत, पंकज पालीवाल, सोनाली साळुंखे, राहुल चौधरी, सुनील दाभाडे, प्रभात तडवी, विलास निकम, मनोहर तेजवाणी, राम महाजन, रत्नाकर पाटील, राजेंद्र कोळी इत्यादी उपस्थित होते. सूत्रसंचालन अरुणा उदावंत यांनी केले. आभार विजय पवार यांनी मानले.

सोनाली साळुंखे, राहुल चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. इ -पुस्तक संकल्पना अरुणा उदावंत व पंकज पालीवाल यांची होती.

या उपक्रमासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील तसेच शिक्षण सभापती रवींद्र पाटील, समाजकल्याण सभापती जयपाल बोदडे, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील , डायट प्राचार्य अनिल झोपे, माध्यमिक शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील ,निरंतर शिक्षणाधिकारी के. ए. पाटील यांचे शुभेच्छा संदेश प्राप्त झाले आहेत.

भाग चार पुस्तकात शिक्षकांचे अभिनव उपक्रम समाविष्ट केलेले असून त्यापासून इतरांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने जिल्ह्यातील शिक्षकांकडून लॉकडाउनच्या कालावधीचा उत्कृष्टरित्या उपयोग करून घेतला व लेखन कौशल्य प्रोत्साहन दिले. खूप मोठा प्रतिसाद या उपक्रमाला मिळालेला आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/717218122541463/

Protected Content