भुसावळ – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बोदवड येथील जामठी रोडवरील जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळेत शैक्षणिक कार्यक्रमात गुरुवारी ‘कला मेळा‘ संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक शेख इकबाल फयाजुद्दीन होते. इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली विविध मॉडेल्स यावेळी सादर करण्यात आली. इयत्ता सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला आणि सुमारे वीस मॉडेल्सनी अत्यावश्यक साहित्य वापरून उत्कृष्ट मॉडेल्स बनवण्यासाठी परिश्रम घेतले. यामध्ये सोलर सिस्टीम, पृथ्वी, हॉस्पिटल, पावसाचे पाणी साठवण, हिरवे जंगल, विविध प्रदूषण, पंच चक्की, ग्लोब, पृथ्वीवरील पाणी आणि जमिनीचा पृष्ठभाग, फुग्यांद्वारे हवेचे मापक, किल्ले, शेतकरी आणि शेत, जंगलतोड का दुषपरिणाम, हॉस्पिटल आणि शाळांचे मॉडेल तयार करण्यात आले.
यावेळी वर्गशिक्षक आसिफ खान यांनी आमचे प्रतिनिधी लियाकत शाह यांना सांगितले की, “कला मेळ्यांच्या माध्यमातून मुलांना त्यांचे कलागुण दाखविण्याची संधी मिळाली आहे. खरेतर कला ही भावना आणि कल्पना व्यक्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. कलामुळे आपल्याला मानसिकदृष्ट्या आनंदी बनवते.”
मुख्याध्यापक शेख इकबाल फयाजुद्दीन म्हणाले की, “मुलांना त्यांच्यातील कलागुण प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठाची गरज असून आम्ही या दोन्ही गोष्टी जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळेच्या माध्यमातून देऊन त्यांच्यातील कलागुण ओळखून त्यांचा विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक मुलामध्ये काही ना काही लपलेले टॅलेंट असते, ते ओळखण्याची गरज असते.” यानिमित्त शाळेतील सर्व पालकांची सकाळपासूनच शाळेत जल्लोष करण्यात आला होता. पालकांनी वर्गशिक्षक आसिफ खान यांनी आयोजित केलेल्या कला मेळाव्याचेही कौतुक केले आणि असे मेळावे दरवर्षी आयोजित केले जावेत, असे आवाहन केले.
यावेळी बोदवड शहरातील प्रख्यात पत्रकार जिया शेख यांनीही मेळाव्याला भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. यावेळी जिल्हा परिषद उर्दू कन्या विद्यालय बोदवडचे मुख्याध्यापक शेख इकबाल फयाजुद्दीन, शाळेचे समन्वयक सादिक अहमद, नियामत मिर्झा, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक बोदवड सरचिटणीस मजहर मुख्तार शाह, खजिनदार जैनुल आबिदीन, जावेद शाह, आसिफ खान, व सर्व महिलांची उपस्थिती होती. शाळेचे कर्मचारी उपस्थित होते.