जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भावनात पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत आदर्श ग्रामसेवक पुरस्कार सोहळ्याचे वितरण शनिवार ४ मार्च रोजी दुपारी १ वाजता करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामविकास व पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याणमंत्री गिरीष महाजन हे होते. याप्रसंगी खासदार उन्मेष पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी पंकज आशिया, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन, मुख्य लेखा व वित्त अधिकारी बाबुलाल पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील, संजीव निकम, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन आदि उपस्थित होते.
यावेळी बोलतांना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, ग्रामीण भागाच्या विकासात ग्रामसेवकांची भूमिका मोलाची असते. यासाठी ग्रामसेवकांनी ग्रामविकासाच्या योजना आखताना सर्वसामान्य नागरीक नजरेसमोर ठेवून विकास कामे करावी. विकासकामांचा दर्जा चांगला राहील यावर भर देतानाच गावाचा कारभारही पारदर्शक राहिला पाहिजे. ग्रामसेवकांनी कोरोना काळात चांगले काम केले आहे. यापुढील काळातही अधिकाधिक चांगल कामे आपल्या हातून घडावीत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते जळगाव जिल्ह्यातील सन 2014-15 ते 2016-17 या कालावधीचे आदर्श ग्रामसेवक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. पुरस्कारार्थीना शाल, सन्मापत्र, सन्माचिन्ह, साडी व ड्रेसचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.