जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा दूध संघाची ५१ वी सर्वसाधारण वार्षीक सभा माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्या अध्यक्षेखाली घेण्यात आली. यावेळी जिल्हा दूध संघाच्या गेल्या वर्षभरात केलेल्या कामांबाबत आढावा बैठक घेण्यात आली.
यात विविध कामासह भागभांडवलासह प्रगतीबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी एकनाथराव खडसे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, दुध संघावर गेल्या साडेसहा वर्षांपासून संचालक मंडळ उत्कृष्टपणे काम करत आहे. दरवर्षी दुधात वाढीसह विक्रीच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. अत्यंत वाईट परिस्थितीतून दूध संघाला पारदर्शक व्यवहारातून नफ्यात आले आहे. सध्याच्या संचालक मंडळाने केलेल्या कामाबद्दल समाधान आहेत. शिवाय जिल्हा दूध संघाच्या हितासाठी संचालक मंडळ कटिबध्द आहेत. जिल्हा दूध संघातील सभासदांच्या अनेक अडचणी सोडविण्यासाठी संचालक मंडळ कटीबध्द आहेत. शिवाय दूध संघाची नफ्याची परंपरा कायम राहिल असे आश्वासन माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी दिले.
याप्रसंगी चेअरमन मंदा खडसे, संचालक वसंतराव मोरे, डॉ. संजीव पाटील, हेमराज चौधरी, प्रमोद पाटील, जगदीश बढे, सुभाष टोके, अशोक पाटील, मधुकर राणे, प्रल्हाद पाटील, शामल झांबरे, डॉ. पूनम पाटील, सुनिता पाटील, कार्यकारी संचालक मनोज लिमये यांच्यासह दूध संघाचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.