जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यू प्रतिनिधी | जळगाव जिल्हा कॉम्प्युटर डीलर्स असोसिएशन तर्फे जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरील कॉम्प्युटर डीलर्स, वितरक, सेवा पुरवठादार आणि सभासदासाठी आयोजित क्रिकेट स्पर्धेत अंतिम समाना टी पी लिंक संघाने जिंकला. विजेत्यांना पारितोषिके आणि विजेत्या संघाला विजयी करंडक गोदावरी समूहाचे संचालक माजी खासदार उल्हासदादा पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
प्राथमिक आणि उपांत्य फेरीचे सामने जिंकून टी पी लिंक विरुद्ध ऐन पी एवि या संघाच्या दरम्यान आजचा अंतिम सामना खेळला गेला. आणि या चुरशीच्या सामन्यात टी पी लिंक संघांनी २४ धावानी ऐन पीएवि संघांवर मात केली.
आज झालेल्या सामन्यात आकीब शेख, भावीन मेहता, राजेश धींगळे, भरत मथानी, पवन चौधरी, सागर बांगर, केशव ठाकूर आदींना मॅन ऑफ दि मॅच पुरस्कारांनी गौरवण्यात आले. तीन सामन्यात १६० धावा काढणारे राजेश ढिगळे यांना उत्कृष्ट फलंदाज आणि मॅन ऑफ द टूर्नामेंट म्हणून पुरस्कार देण्यात आला, पाच सामन्यांमध्ये सहा बळी घेणारे जितेंद्र कोल्हटकर यांची बेस्ट बॉलर म्हणून निवड करण्यात आली. आकीब शेख,भावीन मेहता,राजेश धींगळे, भरत मथानी,अनिरुद्ध विभांडीक, सागर बांगर आदींनी अर्धशतकी खेळी केल्या. समारोपाच्या कार्यक्रमात विजेत्यांना पारितोषिके आणि विजेत्या संघाला विजयी करंडक प्रदान गोदावरी समूहाचे संचालक माजी खासदार उल्हासदादा पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
स्पर्धेच्या दरम्यान सर्व संगणक उत्पादक आणि संबंधित किरकोळ उत्पादनाचे सर्व विक्री प्रतिनिधी, किरकोळ विक्रेते आणि सेवा संस्थानात संस्थाचालक यांनाही गौरवण्यात आले.
सदरहू स्पर्धेसाठी जिल्हा कम्प्युटर डीलर्स असोसिएशन चे अध्यक्ष श्री.संजय चौधरी,अनिल शिरसाळे,भरत मथानी,बापूराव साळुंखे,शरद चव्हाण,अनुराग अग्रवाल, सचिन दुनाखे,योगेश पाटील, पंकज पवनीकर आदींनी परिश्रम घेतले.