जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची पहूर पेठला भेट ; दिल्या विविध सूचना

पहूर, ता. जामनेर, प्रतिनिधी । येथे कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप पाटोळे यांनी प्रतिबंधित क्षेत्रास भेट देवून पाहणी केली. तसेच आरोग्य विभाग , ग्रामपंचायत प्रशासनास आवश्यक सूचना केल्या.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप पाटोळे यांनी प्रतिबंधित क्षेत्रास भेट देवून पाहणी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेश सोनवणे , डॉ.जितेंद्र वानखेडे ,डॉ.जितेंद्र जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी , माजी पंचायत समिती सभापती बाबुरावअण्णा घोंगडे, रामेश्वर पाटील, पहूर पेठचे उपसरपंच श्यामराव सावळे आदी उपस्थित होते.

ध्वनी क्षेपकाकाद्वारे जनजागृती
पहूर मध्ये कोरोनाची संसर्ग साखळी रोखण्यासाठी उद्यापासून तीन दिवस कडकडीत बंद पाळण्यात येणार असून या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे .

बसस्थानकावरील गर्दीला ओहटी

काल पहूर पेठ गावात कोरोना बाधीत रुग्ण आढळून आल्यानंतर कालच्या तुलनेत आज बस स्थानक परिसरात गर्दी काहीशी ओसरली आहे. पोलिस प्रशासनाच्या पहूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी यांनी बस स्थानक परिसरात बंदोबस्त लावण्यात आला आहे. दरम्यान, पहूर पेठ येथे  कोरोनाचा शिरकाव  झाल्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यासह जिल्ह्याची यंत्रणा सतर्क झाली असून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . दिलीप पाटोळे यांच्या पाठोपाठ प्रांताधिकारी दीपमाला चौरे यांनीही  प्रतिबंधित क्षेत्रास भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी गट विकास अधिकारी डी. एस. लोखंडे ,माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे, आरोग्य दूत अरविंद देशमुख, रामेश्वर पाटील ,  शंकर घोंगडे , ग्राम विकास अधिकारी डी. पी. टेमकर , अरूण घोलप ,संदीप बेढे , भारत पाटील, गणेश मंडलीक, शकिल तडवी आदी उपस्थित होते .

Protected Content