Home Cities जळगाव जिल्हा अर्बन को-ऑप बँक्स असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी प्रविणभाऊ कुडे

जिल्हा अर्बन को-ऑप बँक्स असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी प्रविणभाऊ कुडे


Untitled 1 copy 1

जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्हा अर्बन को -ऑप बँक्स असोसिएशन लि.च्या उपाध्यक्षपदी दि अर्बन को -ऑप बँक लि. धरणगावचे संचालक प्रविण कुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

असोसिएशनच्या संचालक मंडळाची सभा अध्यासी अधिकारी आय. बी. तडवी यांचे अध्यक्षतेखाली झाली. सभेस असोसिएशनचे अध्यक्ष सतिश मदाने, संचालक चंद्रहासभाई गुजराथी, दादासाहेब नेवे, ज्ञानेश्वर महाजन, शरदभाऊ यावलकर, विवेकभाऊ पाटील, अशोक खलाने, शांताताई वाणी, डॉ. नरेंद्रदादा शिरसाठ, लालचंद सैनानी, सुरेश झोपे, संजय बिर्ला आदी मान्यवर उपस्थित होते.


Protected Content

Play sound