शिव भोजन थाळी १५० पेक्षा जास्त गरजूंना मिळणार ; तहसीलदार देवगुणे

 

रावेर, प्रतिनिधी ।  जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्हात शिव भोजनाची थाळी दरोरोज १५० व्यक्तीना देण्याचा आदेश केला आहे. उद्यापासुन याचा लाभ घेता येणार असल्याचे तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी सांगिले.

गरीब व गरजू जनतेला स्वस्त दरात शिवभोजन थाळी उपलब्ध करुन देण्यासाठी शिवभोजन योजना सुरु केलेली आहे. सद्य परिस्थितीत जळगाव जिल्हयासाठी एकूण ३५०० थाळीखपाचा उद्दीष्ट मंजूर करण्यात आलेला आहे. गरीब व गरजू व्यक्ती तसेच कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मंजूर,  स्थलांतरीत , बेघर तसेच बाहेरगावचे विद्यार्थी इत्यादींच्या जवेणा अभावी हाल आपेष्टा होऊ नये यासाठी गुरुवार दि . १५ एप्रिल , २०२१  पासुन पुढील एक महिन्यापर्यंत शिवभोजन थाळी नि : शुल्क उपलब्ध करुन देण्यात यावी तसेच शिवभोजन केंद्रांना यापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या थाळी खपाच्या उद्दीष्ट दिड पट वाढ करण्याचेही निर्देश  देण्यात आहेत.

दरोरोज २०० थाळी करण्याची राष्ट्रवादीची मागणी

दरम्यान, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दरोरोज १५० शिव भोजन थाळी देण्याचे आदेश असतांना आज राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे निळकंठ चौधरी युवक शहराध्यक्ष प्रणित महाजन यांनी तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना निवेदन देऊन ही थाळी दरोरोज २०० लाभार्थांना देण्यात यावी अशी मागणी केली आहे.

 

Protected Content