जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील पाटणा गाव येथे आदीवासी समाजाच्या दफनभूमीवर बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून केले आहे. ही जागा आदीवासी समाज बांधवांना देण्यात यावी, या मागणीसाठी मंगळवार १० मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बहुजन एकलव्य आदीवासी परिषदेच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चाळीसगाव तालुक्यातील पाटणा गावात आदिवासी समाजबांधव अनेक वर्षांपासून वास्तव्याला आहे. आदिवासी समाजासाठी गट नंबर २१४ आणि २१५ मध्ये दफनभूमी आहे. पुर्वीपासून आदिवास समाज याठिकाणी संस्कृतीप्रमाणे मयत झालेल्या अदिवासींचे अंत्यविधी दफन करण्यात येत आहे. परंतू गेल्या काही महिन्यापासून गावातील नितीन बोडखे, किरण चौधरी, शांताराम चौधरी, नितीन सोनवणे, शशी आव्हाड, अण्णा शेठ, हिम्मत नांगरे, उमेश आव्हाड, महेश आव्हाड, गगन सोनवणे आणि योगेश काळे यांनी आदिवासी समाजाच्या दफनभूमीवर तारेचे कुंपन लावले असून अतिक्रमण केले आहे जे बेकायदेशीर आहे. हे अतिक्रम काढण्यात यावे यामागणीसाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. मात्र अद्यापपर्यंत याकडे कोणतीही कारवाई केलेली नाही. दरम्यान अतिक्रमण केल्याची तक्रार दिल्यावरून गावातील गावगुंडांकडून जीवेठार मारण्याची धमकी मिळत आहे. तर तातडीने याकडे लक्ष देवून आदिवासी समाज बांधवांना हक्काची दफनभूमी देण्यात यावी या मागणीसाठी मंगळवारी १० मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बहुजन एकलव्य आदीवासी परिषदेच्या वतीने आदोलन करण्यात येत आहे. याप्रसंगी ममता गायकवाड, रमेश निकम यांच्यासह आदिवासी उपस्थित होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/741255503706029