मुंबई प्रतिनिधी । जितेंद्र आव्हाडांच्या उपस्थितीत एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचे उघडकीस आल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आव्हाड यांना मंत्रीमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर ठाण्यात राहणार्या एका सिव्हिल इंजिनिअर तरुणाने गंभीर आरोप केल्यामुळे खळबळ उडाली आहे. याबाबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एखाद्या व्यक्तीला मंत्र्यांच्या सुरक्षारक्षकाने, मंत्र्यांच्या घरी नेऊन, मंत्र्यांच्या उपस्थितीत बेदम मारहाण करणे, ही अतिशय गंभीर घटना आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री जितेंद्र आव्हाड याना मंत्रिमंडळातून तत्काळ बडतर्फ करावे अशी मागणी त्यांनी केली आहे. सोशल मीडियाचा कुणी चुकीचा वापर केला तर तक्रार करण्याचा आपला अधिकार अबाधित आहे. पण शासनकर्तेच मारहाण करीत असतील, तर कायद्याचे राज्यच अस्तित्वात राहणार नाही असा आरोप त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.
दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. या प्रकरणी प्रविण दरेकर यांनी ठाणे शहरचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे संर्पक साधून संबंधितांविरुध्द तातडीने व निपक्षपातीपणे चौकशी करण्याची मागणी केली आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००