जामुनझीरा येथे अल्पवयीन मुलीशी अतिप्रसंग

 

यावल : प्रतिनिधी । तालुक्यातील दुर्गम भागातील जामुनझीरा या आदिवासी वस्तीवर अल्पवयीन मुलीचा  विनयभंग करत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्यावरून एकाविरुद्ध येथील पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जामुनझीरा या आदिवासी गाव वस्तीवर ४ दिवसांपूर्वी दुपारी मुलीची आई शेतात पेरणीसाठी गेली असता  १२ वर्षीय मुलगी  घरात एकटी असल्याचे पाहून  रमा देवसिंग बारेला याने घरात घुसून फिर्यादीची पुतणी तिचा हात धरून तिला घराच्या  बाजुस असलेल्या चाऱ्याच्या खोलीत नेले  तिला लज्जा वाटेल असे अश्लील कृत्य करत  विनयभंग  व  अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला,

 

पीडित बालिकेच्या आईने सोमवारी येथील पोलिस स्टेशनमध्ये या गुन्ह्यातील संशयित आरोपी रमा देवसिंग बारेला याचा विरुद्ध तक्रार दिल्यावरून  विनयभंगासह पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे . गुन्हा केल्यापासुन आरोपी फरार आहे .

 

Protected Content