आबासाहेब देशमुख यांना पीएच.डी.

जळगाव, प्रतिनिधी  ।  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाअंतर्गत शिरपूर येथील एसपीडीएम महाविद्यालयाचे प्रा. आबासाहेब माणिकराव देशमुख यांनी  इतिहास विषयात पीएच.डी. पदवी संपादन केली आहे.

 

प्रा. आबासाहेब देशमुख  हे  “अजिंठा  लेणीचित्रात दृग्गोचर होणाऱ्या राजकिय व सामाजिक जीवनाचा एक ऐतिहासिक अभ्यास” या विषयावर डॉ. जगताप पी.डी सेवानिवृत्त संचालक ,सामाजिक शास्त्रे प्रशाळा कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांचे मार्गदर्शनाखाली पीएच.डी.पदवी प्राप्त करणारे विसावे संशोधक विद्यार्थी आहेत.  आबासाहेब देशमुख हे  इतिहास, समाजशास्त्र ,राज्यशास्त्र ,मराठी  विषयात सेट परीक्षा देखील उत्तीर्ण झाले आहेत. त्यांचे ईस्ट खानदेश एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अरविंद लाठी, मानद सचिव मुकुंद लाठी व विश्वस्त, किसान विद्या प्रसारक संस्थेचे पदाधिकारी ,धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष तथा संस्थाध्यक्ष तुषार रंधे ,  सचिव  निशांत रंधे , कोषाध्यक्ष श्रीमती आशाताई रंधे , माजी प्राचार्य डॉ.एस एन पटेल , प्रभारी प्राचार्य डॉ. व्ही एम पाटील, विश्वस्त  रोहित रंधे, उपप्राचार्य डॉ. फुला बागुल, प्राध्यापक पी .जी .पारधी , डॉ. एम व्ही पाटील , प्रा.डी बी पाटील,इतिहास विभागातील प्राध्यापक वृंद , डॉ.एल पी देशमुख , डॉ. डी आर चव्हाण व शहाद्याचे डीवायएसपी  पुंडलिक सपकाळे,प्रिंसिपाल डॉ. बाबू शेख,विभागीय शिक्षण संचालक शशिकांत हिंगोणेकर, भगीरथचे डॉ. व्ही. एस. पाटील,  डॉ.नरसिंग परदेशी  यांनी अभिनंदन केले  आहे.

Protected Content