जळगाव प्रतिनिधी । जामनेर – भुसावळ रोड दरम्यान असलेल्या एका टेकडीवर बेकायदेशीर सुरू असलेली गावठी दारू भट्टी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उद्ध्वस्त केली. दोघांविरोधात जामनेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, जामनेर पो.स्टे हद्दीत जामनेर ते भुसावळ जाणाऱ्या रोडवर हॉटेल विशालचे पलीकडे टेकडीजवळ जामनेर शिवारात कलीम मिस्तरी यांचे मालकीचे शेताचे बांधावर संशयित आरोपी विजय बंडू मोरे रा . खडकी ता . जामनेर, सचिन संतोष बोरसे,रा. जामनेर पुरा , जामनेर हे बेकायदेशीद देशा गावठी हातभट्टीची दारून तयार करतांना आढळून आले. दोघांच्या ताब्यातून १५०० रूपये किंमतीची तयार दारू, कच्चे व पक्के ८०० लिटर रसायन असे एकुण २२ हजार रूपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापु रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि सुधाकर लहारे, स.फौ. रा. का. पाटील, पोहेकॉ राजेश मेंढे, पोहेकॉ संजय हिवरकर, पोहेकॉ अनिल इंगळे, पोहेकॉ सुधाकर अंबोरे पोहेकॉ रमेश चौधारी, पोना संतोष मायकल, पोना किरण धनगर, पोना प्रमोद लाडवंजारी, पोहेकॉ राजेंद्र पवार, पोहेकॉ दीपक चौधरी यांनी कारवाई केली.