जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील मागासवर्गीय समाजाच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित पडून असलेल्या मागण्यांचा शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही समस्या सुटत नसल्याने नागरिकांनी आमरण उपोषण सुरू आहे.
तालुक्यातील सारगांव येथे मागासवर्गीय घरकुल योजनेत गावातीलच काही समाजकंटक हस्तक्षेप करून मागासवर्गीयांना घरकुलाचा लाभ मिळू देत नाही. अशा घटकांवर गुन्हे दाखल करण्यात यावे. संबधित लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळवून देण्यात यावा. लोंढरी गावातील मागासवर्गीयांच्या स्मशानभुमीच्या पक्के घर बांधून अतिक्रमण केलेले आहे. ते ग्रामपंचायत प्रशासनाने काढून स्मशानभूमीला तारेचे कुंपण करून द्यावे. डोंगरगाव सिल्लोड येथे बौद्ध समाजातील आई व मुलीचा निर्घृण हत्या करण्यात आली. त्याचा योग्य तपास होवून त्यातील आरोपींवर कडक कारवाई व्हावी. जैव विविधता नोंद वहीचे काम न करणाऱ्या ग्रामपंचायतीं वर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. वर्षानुवर्षे मागासवर्गीय कसत असलेल्या गायरान जमिनी नावावर लावाव्या. शहरातील भुमीगत गटारींचे कामे निष्क्रुठ दर्जाचे होत ते काम थांबवण्या येवून त्याची चौकशी व्हावी, अशा मागण्या निवेदनातुन करण्यात आलेल्या आहे. भगवान सोनवणे, विक्रम बनसोडे, रत्नाकर जोहरे, चिंधु सुरवाडे, गणेश सपकाळे, प्रकाश मगरे, प्रल्हाद निकम, सुनील सुरवाडे, जगन निकम, कैलास सुरवाडे हे या आंदोलनात सहभागी आहेत.