जामनेर, प्रतिनिधी | जामनेर येथे महामानवाच्या जयंतीनिमित्त खानदेश तेली समाजातर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन आज करण्यात आले. सदर शिबिरात ५० रक्त दात्यांनी रक्तदान केले.
जामनेरात संत संताजी जगनाडे महाराज, हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व सुभाष चंद्र बोस या महामानवाच्या जयंतीनिमित्त खानदेश तेली समाजातर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन आज करण्यात आले. तत्पूर्वी संत संताजी जगदाळे महाराज यांचे प्रतिमा पूजन करून नगराध्यक्षा साधना महाजन यांनी अभिवादन केले. तसेच त्यांच्या हस्ते भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी एकूण ५० दात्यांनी रक्तदान केले.
यावेळी भुसावळचे अनिल चौधरी, तेली समाज धुळेचे जिल्हा अध्यक्ष कैलास चौधरी, धुळे जिल्हा सचिव रवींद्र चौधरी, धुळे जिल्हा महिला जिल्हाध्यक्ष मालती चौधरी, जळगाव जिल्हा महिला जिल्हाध्यक्ष सुनंदा चौधरी, खानदेश जिल्हा कार्याध्यक्ष वैशाली चौधरी, जळगाव म.न.पा.महेश चौधरी , दत्तात्रय चौधरी, सुभाष चौधरी,
खान्देश तेली समाज मंडळ जामनेर तालुका अध्यक्ष अजय चौधरी, शहराध्यक्ष निलेश चौधरी, सचिव रामेश्वर चौधरी, खान्देश तेली समाज महिला तालुकाध्यक्ष स्वाती चौधरी, महिला मंडळ तालुका सचिव डॉ. योगिता चौधरी, भगत सोनल जाधव आदी मान्यवर आदी उपस्थित होते.