Home धर्म-समाज माळी समाजाचे आरक्षणाबाबत निवेदन; माजी मंत्री खडसेंची घेतली भेट

माळी समाजाचे आरक्षणाबाबत निवेदन; माजी मंत्री खडसेंची घेतली भेट

0
100

वरणगाव प्रतिनिधी । ओबीसीत विविध घटकांतील समाजाला न्याय मिळावा या उद्देशाने महाराष्ट्र माळी समाज महासंघ जळगांव जिल्हा,  समता परिषद जळगाव जिल्हा, खान्देश माळी समाज महासंघ यांच्यावतीने आज राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांची त्यांच्या मुक्ताईनगर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट निवेदन देण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेश्याध्यक्ष शालिग्राम ओंकार मालकर, समता परिषद जिल्हाध्यक्ष सतीश महाजन सर, खानदेश माळी महासंघाचे प्रदेश्याध्यक्ष प्रकाश महाजन, मुक्ताईनगर माजी सभापती राजेंद्र माळी, महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा वरणगावं राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष माळी, प्रशांत महाजन राष्ट्रीय फुले ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र , चाळीसगाव समता परिषद शहराध्यक्ष शांताराम चौधरी, नारायण महाजन, गुलाबराव सोनवणे, किरण महाजन, सचिन माळी उपस्थित होते. यावेळी ओबीसींच्या विषयावर नाथाभाऊंसोबत विस्तृत चर्चा झाली तसेच आगामी नियोजन करण्यात आले.

 

 


Protected Content

Play sound